मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकण व घाटमाथ्यावर पावसाला सुरुवात झाली. कोकण किनारपट्टी व पूर्व विदर्भात ढगांची दाटी झाली. मुंबईसह कोकणात सोमवारी सकाळपासूनच संततधार पावसाने हजेरी लावली होती. आज कोकणात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रातही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.